SUV driver Manuj Kathuria (PC - X/@snehamordani)

Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये यूपीएससीच्या तीन उमेदवारांच्या मृत्यूप्रकरणी (Delhi IAS Coaching Center Tragedy) तीस हजारी न्यायालयाने (Tis Hazari Court) गुरुवारी एसयूव्ही चालक मनुज कथुरिया (SUV driver Manuj Kathuria) ला जामीन मंजूर केला. या प्रकरणातील व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. बुधवारी न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मनोज कथुरिया यांच्यावर आरोप आहे की, त्यांच्या कारच्या भरधाव वेगामुळे कोचिंग सेंटरच्या आत वेगाने पाणी शिरले. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताच्या दिवशी संध्याकाळी 6.45 वाजता ते कोचिंग सेंटरसमोरून त्यांच्या एसयूव्हीमधून निघाले होते.

दरम्यान, 30 जुलै रोजी तीस हजारी न्यायालयाने जुन्या राजेंद्र नगर येथील राव कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात थार एसयूव्ही चालकाच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज न्यायदंडाधिकारी विनोद कुमार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. कथुरिया यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, ज्यांचा अपघाताशी काहीही संबंध नाही अशा लोकांना अटक करण्यात दिल्ली पोलीस व्यस्त आहेत. या घटनेसाठी आपल्या क्लायंटला दोषी कसे ठरवता येईल? त्यांच्या आशिलाला माहित नव्हते की, त्याच्या ड्रायव्हिंगमुळे असे काहीतरी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. (हेही वाचा -Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्ली अभ्यासिकेत पाणी घुसल्याने तिघांचा मृत्यू झाल्यानंतर IAS कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक ताब्यात)

तथापी, दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील (एसपीपी) अतुल श्रीवास्तव यांनी कथुरिया यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता आणि म्हटले होते की, कथुरिया हे प्रशासकीय स्तरावर निष्काळजीपणासाठी दोषी नाहीत, परंतु त्यांनी ही घटना अधिक गंभीर केली आहे. कथुरिया यांचे काही व्हिडिओ कोर्टात प्ले करण्यात आले होते, ज्यामध्ये तो तीच एसयूव्ही चालवताना दिसत होता. आरोपी हा मस्तीखोर स्वभावाचा असून त्याने हा प्रकार मौजमजेसाठी केला असल्याचा युक्तिवाद एपीपीने सुनावणीदरम्यान केला होता. (हेही वाचा -Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्लीमध्ये अभ्यासिकेत घुसलं पाणी; 3 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? जाणून घ्या)

पहा व्हिडिओ - 

कथुरिया यांच्यावर पावसाच्या पाण्याने भरलेल्या कोचिंग सेंटरसमोरील रस्त्यावरून त्यांची कार चालवल्याचा आरोप आहे. रस्त्यावरील पाण्याच्या दबावामुळे कोचिंग सेंटरचे एक गेट तुटले. त्यामुळे पाणी तळघरात शिरले. आयपीसी कलम 105, 106 (1) (कोणत्याही व्यक्तीचा निष्काळजीपणाने मृत्यू घडवून आणणे), 115 (2) (स्वैच्छिकपणे दुखापत केल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.