Delhi Police Registers Criminal Case in Rajendra Nagar Incident (Photo Credits: X/@Ecostudy)

Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्लीतील जुने राजेंद्र नगर (Old Rajinder Nagar) येथे झालेल्या कोचिंग दुर्घटनेनंतर (Delhi IAS Coaching Center Tragedy) कोचिंग सेंटरचे मालक (Coaching Center Owner) आणि समन्वयक (Coordinator) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोचिंग सेंटरच्या तळघरात (Basement of the Coaching Centre) पाणी साचल्याने श्रेया यादव, तानिया सोनी आणि नेविन डेल्विन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी बीएनएस कलम 105, 106(1), 152, 290 आणि 35 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. कोचिंग सेंटरचे व्यवस्थापन आणि नागरी संस्थेच्या लोकांची चौकशी सुरू आहे. एमसीडीचे पर्यवेक्षक ऋषीपाल म्हणाले की, काम जवळपास पूर्ण झाले आहे. फक्त 3-4 इंच पाणी शिल्लक आहे. एमसीडीने सर्व मशीन्स बसवल्या आहेत. तळघरासह इमारत पूर्णपणे रिकामी आहे. याठिकाणी कोणीही फसलेले नाही. या दुर्घटनेनंतर दिल्लीच्या महापौरांनी इमारतीच्या नियमांचे उल्लंघन करून तळघरात सुरू असलेल्या कोचिंग सेंटर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा -Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्लीमध्ये अभ्यासिकेत घुसलं पाणी; 3 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? जाणून घ्या)

महापौरांनी दिल्या कारवाईच्या सूचना -

दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी एमसीडी आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, दिल्लीतील अशी सर्व कोचिंग सेंटर्स जी एमसीडीच्या अखत्यारीत आहेत आणि तळघरांमध्ये व्यावसायिक काम चालवत आहेत. तसेच जे इमारत उपनियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्यात येईल. (हेही वाचा - Delhi Rain: दिल्लीत पुढीत दोन ते तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज)

या दुर्घटनेला एमसीडीचा कोणताही अधिकारी जबाबदार असल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे दिल्लीच्या महापौरांनी सांगितलं आहे. दरम्यान, सध्या कोचिंग सेंटरच्या बाहेर आरएएफ युनिट तैनात करण्यात आले आहे.