Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Uzbek Woman Found Dead In Bengaluru Hotel: उझबेकिस्तान (Uzbekistan) मधील 37 वर्षीय महिला बुधवारी बेंगळुरूमधील हॉटेलच्या (Bengaluru Hotel) खोलीत मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी सांगितले की, जरीन नावाची महिला 5 मार्च रोजी बेंगळुरूला आली होती. ती शहरातील शेषाद्रिपुरम भागातील एका हॉटेलमध्ये थांबली होती. पोलिसांनी सांगितले की, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी 4.30 वाजता दरवाजा ठोठावला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मास्टर चावीचा वापर करून दरवाजा उघडला. त्यावेळी कर्मचाऱ्यांना जरीन बेडवर मृतावस्थेत आढळली.

बेंगळुरू सेंट्रल डीसीपी शेखर यांनी सांगितले की, पोलिसांना तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जरीन एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. फॉरेन्सिक टीम, पोलीस आणि श्वान पथक तपासासाठी जरीनच्या खोलीत पोहोचले आहे. (वाचा -Bihar: बिहारमध्ये पोषण आहारातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू (Watch Video))

हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गूढ मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तिच्या पासपोर्टची चौकशी करत आहेत. याप्रकरणानंतर हॉटेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तथापी, पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. (वाचा -Gurugram Shocker: अपत्य नसलेल्या बहिणीसाठी भावाने केले मुलाचे अपहरण)

दरम्यान, बेंगळुरूच्या दक्षिण-पूर्वेकडील चांदापुरा येथील एका निवासी इमारतीत सोमवारी सकाळी एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांना खोलीत ड्रग्ज आणि एक सिरिंज सापडल्याने महिलेच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. ही महिला पश्चिम बंगालमधील असून एका तांत्रिक तज्ञाच्या मालकीच्या निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत राहत होती. ती शेवटची 40 वर्षांच्या पुरुषासोबत दिसली होती. ज्या खोलीत महिलेचा मृतदेह सापडला त्या खोलीत तो राहत होता.