प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्याच्या डिजिटल युगामध्ये जवळजवळ प्रत्येकजण स्मार्ट उपकरणांचा (Smart Devices) वापर करत आहे. त्यामुळे सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी फक्त पैशांपर्यंत मर्यादित असणारे हे गुन्हे आता तुमच्या बेडरूमपर्यंत पोहोचले आहेत. फोन किंवा संगणक हॅक (Hack) करणे हा प्रकार सर्रास घडतो. मात्र गुजरातमध्ये चक्क स्मार्ट टीव्ही (Smart TV) हॅक करण्यात आला आहे. टीव्ही हॅक करून पती पत्नीमधील नाजूक क्षणांचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यात आला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, खासदार अमर साबळे यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला होता, त्यानंतर तो आता जास्तच चर्चेत आला आहे.

सध्या देशात कोणीही सुरक्षित नाही. तुम्ही वापरत असलेल्या डिव्हाईसेसद्वारे कोणी ना कोणी तुमच्यावर लक्ष ठेवत असते. सुरतमध्ये स्मार्ट टीव्ही हॅक झाल्याच्या दोन घटना घडल्या होत्या, त्यामुळे सध्या हाच मुद्दा चर्चेत आहे. आपल्या ‘त्या’ क्षणांचा व्हिडिओ इन्टरनेटवर पाहिल्यावर त्या जोडप्याची झोपच उडाली. कोणत्याही सिस्टमविना हॅकर्सनी हे कृत्य केले आहे, त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. (हेही वाचा: भारतीय तरुणाने 10 मिनिटात Instargram हॅक करून मिळवले 20 लाखाचे बक्षीस (Watch Video))

याबाबत अमर साबळे राज्यसभेत म्हणाले, ‘जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि इंटरनेटविश्वात दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहेत. मात्र तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. हॅकर्स आता आपल्या बेडरुममध्ये घुसून आपल्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. ही अतिशय चुकीची आणि धक्कादायक बाब आहे.  या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमर यांनी केली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही या मुद्द्यावर आक्षेप नोंदवला आहे.