Shatabdi Express Stone Pelting Incident: शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक, खिडक्यांचे नुकसान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Shatabdi Express Stone Pelting Incident: शताब्दी ट्रेन 12045  ट्रेन दिल्ली ते चंदीगढ येथून प्रवास करत असताना एक धक्कादायक घटना घडली आहे.  अज्ञात टोळक्यांनी धावत्या ट्रेनमध्ये दगडफेक केल्याचा दावा एका पत्रकाराने केला आहे. या घटनेची पत्रकाराने माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही घटना 24 जून सोमवारी 10.03 च्या सुमारास घडली आहे. पत्रकाराने पुढे लिहले आहे की, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी  झालेली नाही. घटनेनंतर पत्रकाराने आरपीएफला बोलावून घेतले. त्यांनी घटनीची माहिती अधिकाऱ्यांना दिली. या घटनेचा पुढील तपसील घेतला जात आहे. तक्रारदाराने सांगितले की, या आधी काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. दगडफेकीमुळे ट्रेनच्या काचा फुटल्या आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (हेही वाचा- प्रसूती रजेबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरोगसीद्वारे आई झाल्यास मिळणार सहा महिन्यांची बालसंगोपन रजा)