Stone Pelted At Mumbai-Solapur Vande Bharat Express: गुरुवारी जेऊर रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर (Mumbai-Solapur Vande Bharat Express) अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. हा दगड ट्रेनच्या C-11 कोचवर आदळला. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसरच्या एका काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच ट्रेनने आपला प्रवास पुढील व्यत्ययाशिवाय सुरू ठेवला.
वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता आणि प्रगत तंत्रज्ञान पाहता हाय-स्पीड ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत या घटनेने चिंता निर्माण झाली आहे. गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी स्थानिक कायद्याच्या अंमलबजावणीसह रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा -Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे महाराष्ट्रात 3 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळापत्रक)
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, पहा व्हिडिओ -
दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रेनला झालेल्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच वंदे भारत एक्स्प्रेस सारख्या प्रीमियम सेवेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा राखण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा उपाय लागू केले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. (हेही वाचा - Vande Bharat Trains: लवकरच सुरु होणार Pune-Hubli आणि Kolhapur-Pune मार्गावर आठ डब्यांच्या वंदे भारत गाड्या; जाणून घ्या वेळा, थांबे आणि इतर तपशील)
छत्तीसगडमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक -
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रायल रन दरम्यान दगडफेक केल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली होती. छत्तीसगडच्या दुर्ग ते आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमपर्यंत धावणार असलेल्या या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर दोन दिवसांनी विशाखापट्टणमहून परतत असताना बागबहारा रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती.