Tamil Nadu: तामिळनाडूतील करियापट्टी परिसरात दगडाच्या खाणीत स्फोट, अपघातात तिघांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
Explosion, Death Image (फोटो सौजन्य - Pixabay)

Tamil Nadu: विरुधुनगर जिल्ह्यातील (Virudhunagar District) करियापट्टी (Kariapatti) भागाजवळील दगडखाणीत आज सकाळी स्फोट (Explosion) झाला. या कालावधीत या अपघातात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. विरुधुनगर अग्निशमन व बचाव विभागाने या अपघाताची माहिती दिली आहे. विरुधुनगर अग्निशमन आणि बचाव विभागाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आज सकाळी विरुधुनगर जिल्ह्यातील करियापट्टी भागाजवळील एका दगडाच्या खाणीत झालेल्या स्फोटात किमान तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

प्राथमिक वृत्तानुसार, हा स्फोट एका स्टोरेज रूममधून झाला असून त्यात स्फोटके असल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव पथके काळजीपूर्वक ढिगारा साफ करत आहेत आणि स्फोट न झालेल्या साहित्याचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - Cylinder Explosion In Pune: सिलिंडरच्या स्फोटामुळे मार्केट यार्डातील झोपडपट्टीला भीषण आग; पहा व्हिडिओ)

स्थानिक रहिवाशांनी खदानीबद्दल तक्रारी केल्या आहेत. यापूर्वी ओव्हरलोड ट्रक्समुळे अनेक अपघात झाले आहेत. स्फोटापूर्वी ही खदान तात्पुरती बंद करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही दगडखाणी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.