अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी वाहन क्षेत्रातील मंदी संदर्भात केलेल्या विधानावर मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सीतारमण यांना छत्तीसगडच्या (chhattisgarh) आर्थिक विकासाच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, येथेही ओला (Ola) आणि उबर (Uber) आपल्या सेवा देत आहेत, परंतु येथे अशी परिस्थिती कधीच निर्माण नाही. याउलट येथे रोजगारात वाढ झाली आहे, असे वक्तव्य बघेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून करत सितारमण यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोदी सरकारचे 100 दिवस पूर्ण झालेच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाले की, "आज लोक ईएमआयवर गाडी खरेदी करण्याऐवजी मेट्रोतून प्रवास करणे पसंत करत आहेत. तसेच ओला-उबेर सारख्या सेवांचा अधिक वापर करु लागले आहेत. वाहन क्षेत्रातील घसरण ही एक गंभीर समस्या आहे. या समस्याचे लवकरच नियोजन केले जाईल. मोदी सरकार सर्व क्षेत्रांबाबत गंभीर आहे. त्याचबरोबर वाहन क्षेत्रातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लवकरच आवश्यक पाऊल उचलण्यात येणार आहे. हे सरकार सर्वांचे ऐकते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये २ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत आणि आवश्यकतेनुसार आणखी काही घोषणा करण्यात येतील, असे त्या म्हणाल्या होत्या. महत्वाचे-प्रियंका गांधीनी साधला केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाल्या सरकार आपले डोळे कधी उघडणार?
भूपेश बघेल यांनी केलेले ट्विट-
आदरणीया वित्त मंत्री जी,
हमारे छत्तीसगढ़ में ओला और ऊबर दोनों अपनी सेवाएं दे रहे हैं फिर भी ऑटोमोबाइल सेक्टर में उछाल आया है।
सवाल देश की अर्थव्यवस्था से जुड़ा हुआ है इसलिए आग्रह है कि आप एक बार छत्तीसगढ़ के आर्थिक विकास के मॉडल का अध्ययन कर लें।
यहां तो रोज़गार भी बढ़ा है। https://t.co/GUCd2oLfBS pic.twitter.com/FDU60mKDPR
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) September 10, 2019
सितारमण यांनी केलेल्या विधानावर भूपेश बघेल यांनी जोरदार टीका केली आहे. बघेल म्हणाले की, छत्तीसगडमध्ये ओला- उबेर सुविधा देत आहेत. परंतु या ठिकाणी वाहन मंदीसारखा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. हा प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, म्हणून एकदा विनंती की तुम्ही एकदा छत्तीसगडच्या आर्थिक विकासाच्या मॉडेलचा अभ्यास करा. अशा शब्दातून बघेल यांनी सितारमण यांच्या विधानाला उत्तर दिले आहे.