Ukraine Russia War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी बुखारेस्टहून विशेष विमान मुंबईत दाखल, रावसाहेब दानवेंकडून विद्यार्थाचे स्वागत
(Photo Credit - Twitter)

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांसाठी रोमानियाची (Romania) राजधानी बुखारेस्ट (Bucharest) येथून एक विशेष विमान सकाळी मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनी मुंबईला पोहोचलेल्या विमानातील प्रवाशांचे विमानतळावर स्वागत केले. युक्रेनच्या पूर्वेकडील भागांवर (Ukraine Russia War) रशियाचा भीषण हल्ला सुरू आहे. युक्रेनहून विमानाने गुरुवारी येथे आलेल्या या विद्यार्थ्याने सांगितले की, ही समस्या पूर्वेकडील भागात असून तेथे लोकांना मदतीची गरज आहे. दुसर्‍या विद्यार्थ्याने सांगितले की ते युक्रेनची सीमा ओलांडण्यात यशस्वी झाले, परंतु बरेच विद्यार्थी अजूनही अडकले आहेत.

Tweet

भारत सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढले जात आहे. विशेष विमानांद्वारे लोकांना देशात आणले जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत शुक्रवारी 3726 भारतीयांना विमानाने देशात आणले जाईल. 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 80 विमाने तैनात करण्यात आली आहेत. ज्याची जबाबदारी सरकारने अधिक मंत्र्यांवर टाकली आहे. (हे ही वाचा Ukraine Russia Crisis: युक्रेनच्या खार्किवमधील भारतीय नागरिक/विद्यार्थ्यांसाठी सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना; जाणून घ्या काय करावे, काय करू नये)

सरकारकडून बचावकार्याला वेग

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या बचावकार्याला सरकारने वेग दिला आहे. अधिकाधिक भारतीयांना आणण्यासाठी सर्व फ्लाइट्सच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. 10 मार्चपर्यंत, अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी मिशनमध्ये एकूण 80 विमाने तैनात करण्याचे नियोजन आहे. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्सची आहेत. तज्ञांच्या मते, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून 35 निर्वासनांचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यात एअर इंडियाच्या 14, एअर इंडिया एक्स्प्रेसची 8, इंडिगोची 7, स्पाइस जेटची 1, विस्ताराची 3 आणि इंडियन एअरची 2 उड्डाणे आहेत.