Snake (Photo Credits: Pixabay)

छत्तीसगड (Chhattisgarh) मधील जसपूर (Jashpur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जसपूरमध्ये एका मुलाला साप चावल्यानंतर मुलाने सापाला दोनदा चावा घेतला. त्यामुळे सापाचा मृत्यू झाला. आठ वर्षांचा दीपक घरामागे खेळत होता. त्याला सापाच्या धोक्याची कल्पना नव्हती. अचानक एक साप आला आणि त्याने मुलाच्या हातात गुंडाळून त्याला चावा घेतला. सर्पदंशामुळे दीपक वेदनेने ओरडत होता. साप हातातून सुटत नव्हता म्हणून दीपकने सापाला चावा घेतला. त्यामुळे साप जागीच मरण पावला.

दीपकने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, साप चावल्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. सर्व काही अचानक घडले. तो म्हणाला, "साप माझ्या हाताभोवती गुंडाळला होता आणि मला चावत होता. मला खूप वेदना होत होत्या, मी स्वत:ला सापापासून सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यातून सुटका होऊ शकली नाही. मी दोनदा सापाला चावले ज्यामुळे साप माझ्या हातापासून वेगळा झाला. नंतर तो मेला." (हेही वाचा -Viral Video: कुत्रीने दिला बकरीच्या पिल्लाप्रमाणे दिसणार्‍या एकाला जन्म; विचित्र घटनेची सर्वत्र चर्चा (Watch Video))

सर्पदंश झाल्याची माहिती त्याने कुटुंबीयांना सांगितल्यावर कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. जिथे दीपकला अँटी स्नेक व्हेनम दिले होते. यानंतर दीपकला दिवसभरासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दीपक आता सुरक्षित आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, दीपकला साप चावला तेव्हा विष बाहेर पडले नाही, त्यामुळे दीपकचा जीव वाचला. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. आता तो पूर्णपणे बरा आहे.