पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे (Centre-State Science Council) उद्घाटन केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, मी विनंती करतो की आपण आपल्या देशातील शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करूया. विज्ञान आणि शास्त्रज्ञांवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, 21 व्या शतकातील भारताच्या विकासात विज्ञान ही ऊर्जा आहे, ज्यामध्ये प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला, प्रत्येक राज्याच्या विकासाला गती देण्याची ताकद आहे. आज जेव्हा भारत चौथा औद्योगिक देश आहे. भारताचे विज्ञान आणि या क्षेत्राशी निगडित लोकांची त्यात खूप महत्त्वाची भूमिका आहे.
ते पुढे म्हणाले, विज्ञान हा उपाय, समाधानाचा, विकासाचा आणि नवनिर्मितीचा आधार आहे. याच प्रेरणेने आजचा नवा भारत आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान तसेच जय अनुसंधानच्या नादात पुढे कूच केले. देशातील शास्त्रज्ञांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, पश्चिमेत आइन्स्टाईन, मॅक्स प्लँक, नील्स बोहर, टेस्ला यांसारखे शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगांनी जगाला चकित करत होते. हेही वाचा BJP VS Congress: राहुल गांधींच्या 41 हजारांच्या टीशर्ट वरुन भाजप विरुध्द कॉंग्रेस ट्वीटर वॉर
त्याच वेळी सीव्ही रमण, जगदीश चंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा, एस चंद्रशेखर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ त्यांचे नवीन शोध समोर आणत होते. ते म्हणाले की जेव्हा आपण आपल्या शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करतो तेव्हा विज्ञान आपल्या समाजाचा एक भाग बनते, ते आपल्या संस्कृतीचा एक भाग बनते. त्यामुळे आज माझी पहिली विनंती आहे की आपण आपल्या देशातील शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा गौरव केला पाहिजे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, आमचे सरकार विज्ञानावर आधारित विकासाच्या विचाराने काम करत आहे. 2014 पासून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीत भरीव वाढ झाली आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे, 2015 मध्ये 81 च्या तुलनेत आज भारत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 46 व्या क्रमांकावर आहे.