Uttarakhand Shocker: हरिद्वार हादरलं! काकीशी अनैतिक संबंधावरून चुलत भावाची निर्घृण हत्या, आरोपीला अटक
Uttarakhand PC twitter

Uttarakhand Shocker: उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये काकीशी अनैतिक संबंधावरून आणि संपत्तीच्या वादातून चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेअंतर्गत मृत मुलाच्या चुलत भावाला पोलिसांनी अटक केले आहे. यश उर्फ क्रिश (17) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांनी हत्येचा संशय घेतला. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला शोधून काढा अशी कळकळीची विनंती पोलिसांना केली. बुधवारी हरिद्वार पोलिसांनी यशच्या आरोपीचा शोध घेतला आणि या हत्येचा उलगडा केला आहे. हेही वाचा- पुण्यात कोयत्या गॅंगची दहशत, चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले)

मिळालेल्या माहितीनुसार, यशच्या कुटुंबियांनी सांगितले की, 31 डिसेंबरच्या रात्री यश पार्टीसाठी गेला होता परंतु नंतर तो घरी परतलाच नाही. १ जानेवारी रोजी कंखल पोलिस ठाण्यांतर्गत बैरागी कॅप्म परिसरात यशचा मृतदेह सापडला होता. मृतदेह पाहून यशची निर्घृणपणे हत्या केल्याची दिसून आले.   तपासादरम्यान पोलिसांना समजले की, यश हा त्याच्या चुलत भावासोबत बाहेर गेला होता. कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात यशच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना आरोपी शोधण्यासाठी विनंती केली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर पोलिसांना यशचा चुलत भाऊ अमित याच्यावर संशय आला. पोलिसांनी अमितला ताब्यात घेतले. अमितने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कडक चौकशी केली. त्यानंतर अमितने सर्व हकिकत सांगितली. यशचे काकीसोबत अनैतिक संबंध होते आणि संपत्तीच्या वादातून हत्या केल्याचे कबुल केले.