Shiv Jayanti 2020: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांच्या 390 व्या जयंती निमित्त आज जगभरात विविध कार्यक्रमांचे अअयोजन करण्यात आले आहे. पुण्याजवळ जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मूठभर मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. मात्र त्यांच्या रूपाने जगाला एक महापराक्रमी नेता मिळाला. देशापरदेशामध्ये छत्रपतींच्या राजकीय, प्रशासकीय कौशल्याची वाहवा केली जाते. त्यामुळे आज शिवजयंतीचं औचित्य साधत अनेक बड्या नेत्यांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अष्टपैलू खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासह अनेकांनी शिवरायांना ट्वीटरवर खास ट्वीटच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त केली आहे.
शिवजयंतीचा सोहळा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी दिवशी साजरा केला त्यासोबतच हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 दिवशी झाला आहे अशी नोंद असल्याने त्या दिवशी देखील त्याचं सेलिब्रेशन केलं जातं. Chhatrapati Shivaji Maharaj Quotes: शिवजयंती चं औचित्य साधत पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहचवा शिवरायांचे हे सकारात्मक विचार!
शिवजयंती 2020 निमित्त नरेंद्र मोदी यांची आदरांजली
महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!
Bowing to one of the greatest sons of Mother India, the embodiment of courage, compassion and good governance, the exceptional Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. His life continues to motivate millions. pic.twitter.com/zrnpT5D5oI
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2020
सचिन तेंडुलकर याचे ट्वीट
प्राणाची बाजी लावून
स्वराज्यासाठी बेधडकपणे
लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा.
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.#ShivajiMaharaj #ShivJayanti pic.twitter.com/l1tgvghEZ3
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 19, 2020
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट
हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 19, 2020
शरद पवार यांचे ट्वीट
छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान पराक्रम, कुशल रणनीती यांबरोबरच त्यांनी सर्वसामान्य रयतेच्या हितासाठी बसवलेल्या स्वराज्याच्या सर्वोत्तम प्रशासकीय घडीला जगात तोड नाही. जयंतीदिनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन! pic.twitter.com/wReIKsVpTV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 19, 2020
संभाजी छत्रपती यांचे ट्वीट
छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्याचा महामंत्र आहेत. त्यांच्या चरित्रातून प्रखर राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि अन्याविरुध्द लढा देण्याची उर्जा आपल्या सर्वांना मिळते. त्यांनी निर्माण केलेली युध्दनीती, परराष्ट्र धोरण, न्याय पध्दतीची गरज आजही आपल्या देशाला आहे. pic.twitter.com/LxUidAWo7t
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 19, 2020
अजय देवगण याचे ट्वीट
I idolised Chhatrapati Shivaji Maharaj since school. Of course, when making Tanhaji -The Unsung Warrior, I got reintroduced to his bravery & emotions. Salute one of India’s bravest sons🙏on his birth anniversary.
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 19, 2020
सन 1869 साली जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर खास पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी जोतीराव फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती साजरी केली. त्यावेळेस शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. पुढे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी शिवजयंती मोठ्या स्वरूपात साजरी करण्याला सुरूवात केली.