Shiv Jayanti 2020 (PC - Twitter)

Shiv Jayanti 2020: शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली (Delhi) येथे आयोजित होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात विविध देशांचे 10 राजदूत (Ambassadors) सहभागी होणार आहेत. इस्रायल, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, ट्युनिशिया, सायप्रस या 10 देशांच्या राजदूतांनी शिवजयंती सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले आहे. यासंदर्भात खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. या सोहळ्यात बीव्हीजी समुहाचे प्रमुख तथा प्रसिध्द उद्योजक हणमंतराव गायकवाड (Hanmant Gaikwad) यांना 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात पोलंड आणि बुल्गेरीयाचे राजदूत संबोधित करणार असून पोलंडचे राजदूत खास हिंदीतून भाषण करणार आहेत. या सोहळ्यात शाहिरी, पोवाडे, शौर्यगाथा, शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने मागील दोन वर्ष सलग दिल्लीत शिवजयंती सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले आहे. यंदा दिल्लीतील शिवजयंती सोहळ्याचे हे तीसरे वर्ष आहे. (हेही वाचा - Shivaji Maharaj Jayanti 2020 Messages: शिव जयंती च्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेजेस, Greetings, Facebook आणि WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा शिवरायांचा जन्मदिवस)

छत्रपती शिवाजी महाराजांची महती देशभर पसरावी, यासाठी विविध देशातील राजदूतांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. या सोहळ्यात नाशिक येथील 200 वादकांचे ढोल पथक आपली कला सादर करणार आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता शिवजयंती राष्ट्रोत्सव सोहळ्याला सुरुवात होणार आहे.