आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, राज्यात नायडूंच्या रॅलीदरम्यान ही घटना घडली. घटनेच्या वेळी नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचा नेल्लोरमध्ये रोड शो सुरू होता. घटनेनंतर काही वेळातच त्यांनी बोलणे थांबवले. रोड शो दरम्यान जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चंद्राबाबूंनी एनटीआर ट्रस्टमार्फत मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे आश्वासन दिले. हेही वाचा Girl Circulates Nude Video Of Sister: प्रियकारासाठी लहान बहिणीने बनवला मोठ्या बहिणीचा Nude Video, अनोळखी क्रमांकावरून केली पैशांची मागणी
पहा व्हिडिओ
Tragedy strikes at @JaiTDP's roadshow by @ncbn in Nellore. At least 7 killed as people accidentally fall into a waterbody. Heavy crowding at the roadshow which has now been called off, reports @sudhirjourno pic.twitter.com/JFIlz9W5mw
— Anusha Ravi Sood (@anusharavi10) December 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)