सीरियल किलर (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पश्चिम बंगाल: पूर्व बर्धमान जिल्ह्यातील कालना स्टेशनच्या पोलिसांनी सीरियल किलर (Serial Killer) कामरूजम्मन सरकार (Kamaruzzaman Sarkar) वय -42 याला अटक केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बर्धमान जिल्हा पोलीस या व्यक्तीचा तपास करत होते. कामरूजम्मनने आतापर्यंत तब्बल 12 महिलांवर हल्ला केला आहे त्यातील 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. आधी सायकलच्या चेनने महिलांचा गळा आवळून नंतर डोक्यात रॉडचा वार करून हा महिलांचा खून करता असे. सर्वात विकृत म्हणजे कामरूजम्मन महिलांच्या प्रेतासोबत सेक्स करायचा.

नेहमी नीटनेटक्या पोशाखात राहणारा सरकार दुपारच्यावेळी मीटरचे रीडिंग घेण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करायचा. त्यानंतर आपल्या ठराविक पद्धतीने तो घरत एकट्या असलेल्या महिलांचा खून करायचा. सर्वसाधारणपणे तो मध्यम वर्गीय महिलांना टारगेट करायचा. घरातून काही गोष्टी चोरीही करायचा, मात्र फक्त चोरी हाच त्याचा उद्देश नव्हता. खून केल्यावर तो महिलांच्या प्रेतासोबत सेक्स करायचा. पोलिसांना संशय आहे की, पश्चिम बंगालमध्ये 2013 मध्ये झालेल्या हत्यांमध्येही कामरूजम्मनचा सहभाग असेल. (हेही वाचा: हस्तमैथुन करत दाबायचा गळा, ९०जणाचे घेतले प्राण; सीरियल किलर पोलिसांच्या ताब्यात)

कामरूजम्मन सरकार छोटा व्यापारी आहे. आतापर्यंत त्याने 5 महिलांचा खून केला आहे. काही प्रकरणात खून केल्यानंतर त्याने महिलांच्या प्रायव्हेट रॉडदेखील घुसवला आहे. मात्र यामागे त्याचा नेमका काय उद्देश आहे हे पोलीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कामरूजम्मन सरकारचे लग्न झाले असून त्याला तीन मुले आहेत. पुतूल माझी या महिलेच्या हत्ये प्रकरणी त्याला जिल्हा न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.