संपूर्ण देशावर कोरोना संकट वावरत असताना भारताचे माजी ऍटर्नी जनरल (Former Attorney General) आणि सर्वोच्च न्यायातील जेष्ठ वकील (Senior Advocate) अशोक देसाई यांचे निधन (Ashok Desai Passes Away) झाले आहे. आज सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अशोक देसाई हे 77 वर्षाचे असून त्यांच्या निधानाची बातमी ऐकून अनेकांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे. अशोक देशाई यांच्या निधनानंतर राजकीय नेते, कलाकार आणि वकिलांनी ट्वीटरच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहली आहे. ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी अशोक देसाई एक मोठे व्यक्तिमत्व होते, असे सांगत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या निधानांची माहिती होताच सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.
अशोक देसाई यांची थोडक्यात माहिती-
- 1956 मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली.
- 8 ऑगस्ट 1977 रोजी वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
- 9 जुलै 1996 ते 6 मे 1998 पर्यंत ते भारताचे अॅटर्नी जनरल होते.
- 2001 मध्ये त्यांना पद्मविभूषण तसेच लॉ ल्युमिनेरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 1964 मध्ये लॉ कॉलेज बॉम्बे येथे प्रोफेसर पदाची जबाबदारी संभाळली.
- 1967 ते 1972 दरम्यान बॉम्बे कॉलेज ऑप जर्नलिझम येथे लेक्चरर होते.
अनिल देशमुख यांचे ट्वीट-
सुप्रीम कोर्टातले जेष्ठ वकील,भारताचे माजी अॅटर्नी जनरल अशोक देसाई यांचे निधन झाले. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भावपूर्ण श्रद्धांजली.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 13, 2020
अशोक देसाई यांनी आपल्या जीवनात अनेक पुस्तकेदेखील लिहिली आहेत. तसेच त्याचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.