हेमा मालिनी (Photo Credits: PTI)

कर्नाटकात सुरू असलेला हिजाब वादाचा मुद्दा (Karnatak Hijab Controversy) आता देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय वर्तुळातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. दरम्यान कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. यावर आता अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या शाळा या शिक्षणासाठी असून तेथे धार्मिक बाबी घेऊ नये, असे त्यांनी  बुधवारी सांगितले. हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, प्रत्येक शाळेत गणवेश असतो ज्याचा आदर केला पाहिजे. शाळेच्या बाहेर तुम्हाला हवे ते घालता येते. यासोबतच केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही या वादाबद्दल सांगितले की, ड्रेस कोड, शिस्त आणि सन्मान राखण्याच्या कोणत्याही संस्थेच्या निर्णयाला जातीय रंग देणे हे भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीविरुद्धचे षड्यंत्र आहे. देशातील सर्व संस्था आणि सुविधांवर अल्पसंख्याक समाजाचा समान हक्क आहे.

Tweet

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज कर्नाटक उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एकल खंडपीठाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. आता मोठ्या खंडपीठात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. सीएम बसवराज बोम्मई यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (हे ही वाचा Hijab Controversy: हिजाबच्या वादवरुन बीबी मुस्कान खानला RSS मुस्लिम संघाकडून पांठिबा, 'पर्दा' देखील भारतीय संस्कृतीचा भाग)

‘त्या’ विद्यार्थिनीला जमियत संघटनेकडून 5 लाखांचे बक्षीस

हिजाबच्या वादात मुस्लीम विद्यार्थिनीचा व्हिडिओसोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बीबी मुस्कान या मुस्लिम विद्यार्थिनीच्या धाडसाचे कौतुक केले. त्याचवेळी जमियत संघटनेकडून बीबी मुस्कानला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.