SBI (Photo Credits: Facebook)

भारतीय बँकांच्या निर्बंधांमुळे आधीच खातेधारक हैराण झाले आहेत. आता त्यात अजून गैरसोय होणार असल्याचे समोर आले आहे. एसबीआयने(SBI) काही काळासाठी नेटबँकिग सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय स्टेट बँकेची(State Bank Of India) डिजिटल बँकिंग सेवा (Net Banking) 16 आणि 17 जुलैला बंद राहणार आहे. बँकेची डिजीटल सेवा 150 मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती स्वत: एसबीआयने व्टिट(SBI Tweet) करत दिली आहे. यामुळे नक्कीच याचा परिणाम वापरकर्त्यांवर होणार आहे. यामागचे कारण म्हणजे बँकेचे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मचे काम अजून उत्तम पद्धतीने अपडेट करण्याकरीता ही सेवा काही काळ बंद ठेवणार आहेत. मात्र हे काम एसबीआय  (SBI) रात्री करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खातेधारकांना रात्रीच्या या 150 मिनीटांच्या कालावधीत नेटबँकिग(Net Banking) करता येणार नाही.

नेमकं कधी बंद होणार सेवा ?

बँकेने व्टिटमध्ये लिहिले आहे की, "आम्ही 16 आणि 17 जुलैला रात्री 10.45 ते 1.15  या वेळेत देखभाल दुरुस्तीचे काम करणार आहोत. या कालावधीत इंटरनेट बँकिंग / योनो / योनो लाइट / यूपीआय सेवा उपलब्ध होणार नाहीत. आमच्या ग्राहकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत. तसेच आपल्या सहकार्याची विनंती करतो.

एसबीआय आपले डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म वारंवार अपडेट करत असते. यामुळे त्याची डिजिटल बँकिंग सेवा याआधीही काही काळ थांबली आहे. एसबीआयच्या देशात  22,000 हून अधिक शाखा आहेत. तसेच 57,889 पेक्षाही जास्त एटीएम आहेत. 31 डिसेंबर 2020 पर्यंत एसबीआयची इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग वापरणार्‍या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता ही संख्या वाढून 85 दशलक्ष इतकी झाली आहे. तर बँकेच्या यूपीआयचा वापरणार्‍या ग्राहकांची संख्या 135 दशलक्ष इतकी आहे.

मात्र याचबरोबरीने एसबीआयने खातेधारकांवर अनेक निर्बंध लावले आहेत. यामुळे अनेक तक्रारीही केल्या गेल्या आहेत. खात्यामधील ठेवी रकमेबाबत हे बदल करण्यात आलेले आहेत. नेटबँकिंग सेवा रात्री बंद ठेवणार असल्याने याचा वापरकर्त्यांवर एवढा मोठ्या प्रमाणात फरक पडणार नाही. मात्र तरीदेखील सर्व एसबीआय नेटबँकिंग वापरर्त्यांनी आपली होणारी गैरसोय टाळण्यासाठी काही प्रमाणात का होईना रक्कम जवळ ठेवावी.