Sarkari Naukri: 7th Pay Commission अंतर्गत EPFO मध्ये मोठ्या पदांवर अधिकारी भरती, upsconline.nic.in वर 31 जानेवारी पर्यंत करता येणार अर्ज
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

UPSC EPFO Recruitment 2020: यूपीएससी च्या EPFO विभागात एनफोर्समेंट ऑफिसर आणि अकाउंट्स ऑफिसर पदाच्या तब्बल 421 जागांसाठी मोठी भरती सुरु होणार आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission)  पगारश्रेणी मिळणार आहे. येत्या 31 जानेवारी 2020 च्या संध्याकाळी 6  वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना upsconline.nic.in या संकेतस्थळावर आपला ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. उपलब्ध जागांमधील 62 जागा या एसटी, 33 जागा या ओबीसी, 116 जागा या अनारक्षित प्रवर्गांसाठी उपलब्ध आहेत. तर 168 जागांवर पदनिहाय भरती होणार आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल झाल्यावर उमेदवारांनी 1  फेब्रुवारी 2020 पर्यंत या फॉर्म ची प्रत आपल्याकडे घेऊन ठेवावी. 4  ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या लिखित परीक्षेत हीच परत दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.

7th Pay Commission: सरकारकडून कर्मचार्‍यांना पगारवाढीची भेट; वेतनवाढीसह 3 हप्त्यांमध्ये मिळणार थकबाकी

प्राप्त माहितीनुसार, या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांचे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी शिक्षण पूर्ण झालेले हवे. कायदा शिक्षण/ एमबीए/ कंपनी सेक्रटरी/ सीए/ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट डिग्री असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. याशिवाय संभाडीत उमेदवाराचे 31 जानेवारी पर्यंतचे वय 30 वर्षाहून अधिक चालणार नाही तर एससी/ एसटी वर्गाना यात 5 वर्षांची वाढीव सूट असेल.

दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण असल्यास उमेदवारांनी upsconline.nic.in वर देण्यात आलेली सविस्तर माहिती वाचावी. ही परीक्षा लिखित व प्रत्यक्ष मुलखात या स्वरूपात घेतली जाणार असून मग अंतिम मेरिट लिस्टच्या आधारे उपलब्ध पदांवर नेणमुक होणार आहे.