Sanjay Raut | (PC - ANI)

Nehru Museum Name Change: नवी दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम (Nehru Museum) आणि लायब्ररीचे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय असे नामकरण करण्यात आले आहे. या निर्णयावरून आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसच्या विरोधानंतर आता शिवसेनेनेही (यूबीटी) संग्रहालयाच्या नामांतराचा निषेध केला आहे. शिवसेना (यूबीटी) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, इतर पंतप्रधानांना संग्रहालयात स्थान मिळाले पाहिजे, हे मला मान्य आहे. या देशात इतरही पंतप्रधान झाले आहेत, अटलजी, इंदिराजी, लाल बहादूर शास्त्री, सर्वांनी देशासाठी काम केले आहे. त्या संग्रहालयात असा विभाग असावा ज्यात इतर पंतप्रधानांच्या कलाकृतींनाही स्थान मिळेल, पण संग्रहालयाचे नाव बदलण्याची गरज नाही. (हेही वाचा -Mainpur Clashes: मणिपूरमध्ये Rapid Action Force सोबत जमावाचा पुन्हा संघर्ष, दंगलखोरांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर)

पंडित नेहरूंनी देशाच्या उभारणीत आणि स्वातंत्र्यलढ्यातही योगदान दिलं. या पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान संग्रहालयाला त्यांचे नाव देता आले असते, पण तुम्हाला (भाजप) इतिहास नष्ट करायचा आहे. देश घडवणाऱ्या आमच्या सर्व जुन्या वीरांना तुम्ही नष्ट करू इच्छिता. पंडित नेहरूंबद्दल द्वेषातून हे कृत्य करण्यात आल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे की, नेहरूंसमोर मोदीजींचे व्यक्तिमत्त्व अजूनही लहान आहे. बोर्डातून नेहरूजींचे नाव हटवल्याने नेहरूजींचे व्यक्तिमत्त्व कमी होईल, असे त्यांना वाटते. नेहरू जी अशी व्यक्ती आहेत, ज्यांना देशातील लोक आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विधानाचा संदर्भ देत गौरव बल्लभ म्हणाले की, लहान मनाने कोणीही मोठा होत नाही. तुम्ही लहान मनाची ओळख देशाला करून दिली. तुम्ही इतर ठिकाणातून पंडितजींचे नाव काढून टाकू शकता. मात्र, 140 कोटी लोकांच्या मनातून त्यांचे नाव पुसून टाकू शकणार नाहीत.