मणिपूर रॅपीड अॅक्शन फोर्स (Mainpur Rapid Action Force) आणि दंगलखोर यांच्यात (Mainpur Clashes) पुन्हा एकदा चकमक झाली आहे. दंगलखोरांनी गोदाम जाळले आणि इतर ठिकाणीही जाळपोल केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना आश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दंगल इम्फाळ पॅलेस मैदानाजवळ झाली. दंगलखोरांनी एक गोदाम पेटवून दिले. ज्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही आग लागली. आगीत आदिवासी समाजातील निवृत्त हाय-प्रोफाइल आयएएस अधिकाऱ्याचीही इमारत होती. अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत गोदामाची आग आटोक्यात आणली आणि शेजारच्या घरांमध्ये पसरण्यापासून रोखले.

दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आर के रंजन सिंग यांच्या इंफाळ शहरातील घराची जमावाने काल रात्री (गुरुवार, 15 जून) तोडफोड केली. बेकाबू झालेल्या दंगलखोरांनी सिंह यांचे घर जाळण्याचाही प्रयत्न केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी रात्री उशिरा शहरात फिरणाऱ्या जमावाची सुरक्षा दलांशी चकमकही झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्विट

इम्फाळमध्ये घडलेल्या घटनेबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंग यानी पीटीआय व्हिडिओला सांगितले, “मी 3 मे पासून (जेव्हा राज्यात जातीय संघर्ष सुरू झाला) पासून शांतता प्रस्थापित करण्याचा आणि हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने शांतता समिती स्थापन केली आहे, प्रक्रिया सुरू आहे.