Air India On Cabin Crew Shortage: केबिन क्रूच्या कमतरतेबाबतच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत; एअर इंडियाच्या प्रवक्त्याचं स्पष्टीकरण
Air India | (Photo Credits: Facebook)

Air India On Cabin Crew Shortage: काही फ्लाइट्सना ऑपरेशनल समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परंतु, या तुरळक आहेत आणि त्यावर त्वरित उपाय करण्यात आला आहे. तथापि, केबिन क्रूच्या कमतरतेबाबतच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत, असं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. याउलट, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील वाढत्या रहदारीला तोंड देण्यासाठी एअर इंडियाने गेल्या काही महिन्यांपासून सक्रियपणे नोकरभरती सुरू केली आहे. तरीही, विलंबामुळे आमच्या मौल्यवान प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा - Air India-Vistara Merger: मार्च 2024 पर्यंत होणार एअर इंडिया आणि 'विस्तारा'चे विलीनीकरण; टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा निर्णय)