Air India-Vistara Merger: मार्च 2024 पर्यंत होणार एअर इंडिया आणि 'विस्तारा'चे विलीनीकरण; टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा निर्णय
Air India-Vistara (PC - Twitter and Wikipedia)

Air India-Vistara Merger: टाटा सन्स (Tata Sons) आणि सिंगापूर एअरलाइन्स (Singapore Airlines) ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एअर इंडिया (Air India) आणि 'विस्तारा' (Vistara) चे विलिनीकरण (Merger) मार्च 2024 पर्यंत होणार आहे. सिंगापूर एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सने वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतला आहे.

सिंगापूर एअरलाइन्सकडून असे सांगण्यात आले आहे की, मार्च 2024 पर्यंत विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विस्तारा एअरलाइन्स ही टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स या दोघांची भागीदारी आहे. सिंगापूर एअरलाइन्सचा यात जास्त हिस्सा आहे. आता या नव्या व्यवस्थेअंतर्गत एअर इंडिया ब्रँडच्या नावाने आणखी विमाने अधिक मार्गांवर चालवता येणार आहेत. (हेही वाचा - Air India: एअर इंडियाचे विमान एमरजन्सी डायवर्ट, पायलटच्या तक्रारीमुळे मुंबईत सुरक्षीत लँडींग)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विलीनीकरणानंतर सिंगापूर एअरलाइन्सची कंपनीतील भागीदारी 25 टक्के होईल. यामध्ये ती सुमारे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिंगापूर एअरलाइन्सकडे सध्या विस्तारामध्ये 51 टक्के आणि टाटा सन्सची 49 टक्के हिस्सेदारी आहे. टाटा समूहाने सरकारी निर्गुंतवणुकीचा भाग म्हणून या वर्षाच्या सुरुवातीला सरकारी मालकीची एअर इंडिया 18000 कोटी रुपयांना खरेदी केली होती. (हेही वाचा - Air India चे विमान धावपट्टीवरून घसरले; अपघात टळल्याने वाचले 55 प्रवाशांचे प्राण)

दरम्यान, टाटा समूह सध्या एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशियाच्या मालकीचे आहे. या दोन्ही विमान कंपन्या मार्च 2024 पर्यंत एअर इंडियामध्ये विलीन होणार आहेत. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की, मार्च 2024 नंतर टाटा समूहाच्या मालकीच्या चारही एअरलाइन्स एअर इंडिया याच ब्रँड नावाने काम करतील.