Crime: आरपीएफ इन्स्पेक्टरचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, शुल्लक कारणावरून वृद्ध नागरिकाला मारहाण
Beating | Representational Image (Photo Credits: Pixabay)

एका मद्यधुंद रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) इन्स्पेक्टरने 20 फेब्रुवारी रोजी मंड्या (Mandya) येथील एका वृद्ध नागरिकावर रेल्वे स्टेशनच्या पोलिस स्टेशनमध्ये (Railway Police Station) हल्ला केला आहे. 65 वर्षीय पीडित, जो एक वरिष्ठ विक्रेता आहे. त्याला रेल्वे स्थानकावर उचलल्यानंतर आणि दारूच्या नशेत असलेल्या निरीक्षकाने पोलिस स्टेशनमध्ये बेदम मारहाण (Beating) केल्याने अनेक जखमा झाल्या. यात त्याचा अंगठा तुटला. अबू रामचंद्रन असे हल्लेखोराचे नाव आहे. हा ज्येष्ठ नागरिक आता अंथरुणाला खिळलेला असून तो या हल्ल्यातून बरा होत आहे. मात्र तो कामावर जाऊ शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

निरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे, तर एका कनिष्ठाची विभागातून बदली करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर, अबू रामचंद्रन हे एका व्यावसायिक मुद्द्यावरून नाराज होते. ड्युटीवर मद्यप्राशन केल्याचा आरोप आहे. 65 वर्षीय निंगान्ना, गेल्या 20 वर्षांपासून मंड्या रेल्वे स्थानकावर विक्रेता म्हणून काम करत आहेत. आरपीएफ इन्स्पेक्टरने वातावरण शांत ठेवण्यासाठी वृद्ध व्यक्तीला पैसे देऊ केले. वृत्तानुसार, विक्रेत्याला गप्प बसण्याची धमकी देण्यात आली होती. हेही वाचा विकृतीचा कळस! गर्भवती शेळीवर तीन जणांचा बलात्कार, नंतर केली हत्या; Kerala मधील धक्कादायक घटना

निंगान्ना हे अनधिकृतपणे काम करत होते. कारण त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण बाकी होते. रेल्वे स्थानकात एका ग्राहकाला सेवा देत असलेला विक्रेता पाहून आरपीएफ निरीक्षकाने त्याला हाक मारली. निंगाण्णाने त्याला थांबायला सांगितल्यावर तो संतप्त झाला आणि त्याने विक्रेत्याला प्लॅटफॉर्म वनवरील आरपीएफ स्टेशनवर ओढले आणि त्याच्यावर लाठीमार करून अनेक वार केले, असे अहवालात म्हटले आहे.

मारहाणीपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना निंगाण्णाचा अंगठा तुटल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर निरीक्षक नित्यक्रमानुसार घरी गेले. तथापि, इतर पोलिस कर्मचार्‍यांनी विक्रेत्याला त्याच्या जगण्याची चिंता वाटल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. निगाण्णा डोक्यातून रक्तबंबाळ होऊन रुग्णालयात पोहोचला. जेव्हा निंगान्ना गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस स्टेशनवर पोहोचला. अबूच्या विरोधात तक्रार दाखल करू इच्छित होता तेव्हा पोलिसांनी आरपीएफला सतर्क केले.