विकृतीचा कळस! गर्भवती शेळीवर तीन जणांचा बलात्कार, नंतर केली हत्या; Kerala मधील धक्कादायक घटना
Goat | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

भारतामधील साक्षरतेच्या बाबतील अव्वल असलेल्या केरळमधून (Kerala) एक अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका गर्भवती शेळीवर (Goat) तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार (Rape) करून तिची हत्या केली आहे. होसदुर्ग (Hosdurg) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्टाचेरी (Kottachery) येथील एलिट हॉटेलमधील ही शेळी चार महिन्यांची गरोदर होती व ती पुढील महिन्यात प्रसूत होणार होती. या गुन्ह्याप्रकरणी होसदुर्ग पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचारी सेंथिल याला अटक केली आहे. इतर दोन जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

कर्मचार्‍यांनी हॉटेलच्या पाठीमागे एक शेळी व बकऱ्याला ठेवले होते. बुधवारी (30 मार्च 2022) रात्री 1.30 च्या सुमारास हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना हॉटेलच्या मागून आवाज आला. तेथे पोहोचल्यावर त्यांना तीन लोक भिंतीवरून धावताना दिसले. यावेळी त्यांनी सेंथिलला पकडले. त्यानंतर त्यांना गर्भवती शेळी मृतावस्थेत आढळून आली. शेळीच्या शरीरावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा होत्या. त्यांनी ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या होसदुर्ग पोलिसांनी सेंथिलला ताब्यात घेतले.

हॉटेल मालकाने पोलिसांना सांगितले की, तामिळनाडूचा रहिवासी असलेला सेंथिल हा साडेतीन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात त्याच्याकडे आला होता. आरोपींवर प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 377 अंतर्गत अनैसर्गिक गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात येणार आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, दोषी सिद्ध झाल्यास दोषींना जन्मठेपेची किंवा 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (हेही वाचा: मध्य प्रदेशात लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीची हत्या)

दरम्यान, अलीकडेच उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात आलम अन्सारी नावाच्या व्यक्तीला गायीवर बलात्कार करताना पकडण्यात आले. त्यांनतर लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यासह, 2021 मध्ये पाकिस्तानमध्ये बकरीसोबत सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. ही शेळी घराबाहेर बांधली होती, त्यावेळी 5 जणांनी तिचे अपहरण केले आणि घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात नेले. तेथे आरोपींनी शेळीवर बलात्कार केला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला.