Telangana Governor Resigns: तेलंगणाच्या राज्यपाल Tamilisai Soundararajan यांचा राजीनामा; भाजपचा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता
Tamilisai Soundararajan (PC - X/ANI)

Telangana Governor Resigns: तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे लेफ्टनंट-गव्हर्नर तमिलिसाई सुंदरराजन (Tamilisai Soundararajan) यांनी सोमवारी सकाळी दोन्ही पदांचा राजीनामा दिला. सौंदर्यराजन या भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटच्या नेत्या आहेत. तमिलिसाई सुंदरराजन भाजपचा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्याची शक्यता आहे. सुंदरराजन, यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये तत्कालीन तेलंगणा राज्याचे दुसरे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. तसेच फेब्रुवारी 2021 मध्ये पुद्दुचेरीच्या लेफ्टनंट-गव्हर्नर म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्या पुद्दुचेरीच्या एकमेव लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

किरण बेदी यांची हकालपट्टी केल्यानंतर तमिलीसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. सौंदराराजन यांचा पुद्दुचेरीतील लोकांशी चांगला संबंध आहे. सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या कनिमोझी यांच्या थुथुकुडी जागेसह तामिळनाडूमधील तीनपैकी एका जागेवरून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Assembly Election 2024: निवडणूक आयोगाने बदलले अरुणाचल प्रदेशसह 'या' दोन राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक)

सुंदरराजन यांनी या जागेवरून 2019 ची निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी 2009 मध्ये चेन्नई (उत्तर) जागाही लढवली होती. मात्र, तेथेही त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. सुंदरराजन यांनी 2006 मध्ये राधापुरममधून, 2011 मध्ये वेलाचेरी आणि 2016 मध्ये विरुगंपक्कममधून तामिळनाडू विधानसभा लढवली आहे. परंतु, त्यांचा तिनही निवडणुकांमध्ये पराभव झाला होता.