केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरी (job) मिळवण्याची चांगली संधी समोर आली आहे. सीआरपीएफने देशभरातील विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या (Paramedical staff) भरतीसाठी (Vacancy) अर्ज आमंत्रित केले आहेत. या रिक्त जागेत (CRPF Recruitment 2021) एकूण 2439 पदांची भरती करायची आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या रिक्त पदासाठी अर्ज (Apply) करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट crpf.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज (Online Apply) करू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाने जारी केलेल्या या रिक्त जागेत (CRPF Recruitment) अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या पदांसाठी उमेदवार 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या मुलाखतीत थेट उपस्थित राहू शकतात. अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांचे अर्ज स्वरूप पाहू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाने कंत्राटी तत्त्वावर विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी नियोजित तारीख आणि वेळेला मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ आणि संबंधित कागदपत्रे त्यांच्या फोटो कॉपीसह सेवानिवृत्ती प्रमाणपत्र/पीपीओ, पदवी, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र इ. सोबत बाळगणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना त्यांच्या सर्व तपशीलांसह अर्ज साध्या कागदावर घेऊन जावे लागतील. अर्ज केलेल्या पदाचे नाव अर्जात भरावे लागेल आणि 3 पासपोर्ट आकाराचे फोटो देखील सोबत घ्यावे लागतील.
सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र सेना निवृत्त उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेशी संबंधित अधिक माहितीसाठी, आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकता. केंद्रीय राखीव पोलीस दलात या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अशा परिस्थितीत जे उमेदवार त्यात अर्ज करतील त्यांना 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या मुलाखतीत उपस्थित राहावे लागेल.
रिक्त पदांची माहिती
एआरमध्ये 156 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. तर बीएसएफमध्ये 365 जागा रिक्त आहेत. सीआरपीएफमध्ये 1537 जागांची भरती करण्यात येणार आहे. ITBP मध्ये 130 जागासाठी भरती सुरू आहे. तर एसएसबी 251 पदे भरण्यात येणार आहेत.