बँक खात्यात शून्य रक्कम असलेल्या खातेधारकांना मिळणार 'ही' सुविधा, RBI कडून नियमात बदल
बँक (Photo Credits: Twitter)

बँक खात्यात शून्य रक्कम असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. तर आरबीआयने (RBI) खातेधारकांसाठी काही नियमात बदल केले आहेत. त्यानुसार ग्राहकांना चेकबुक आणि इतर सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तर आरबीआयकडून बदल करण्यात आलेल्या नियमानुसार या सुविधेसाठी बँकेने कोणताही अट ठेवू नये असे सांगण्यात आले आहे.

बेसिक सेव्हिंग अकाउंट हे खातेधारकाला शून्य रक्कमेसह सुरु करता येते. त्यानुसार खातेधारकाला खात्यात विशेष अशी रक्कम ठेवावी अशी अट नसते. तर आता आरबीआयकडून प्राथमिक बचत खात्याच्यानुसार बीएसबीडी हे खाते सुरु करता येते. मात्र यापूर्वी ज्या खातेधारकांचे व्यवहार सुरळीत सुरु असलेल्याच खात्यांसाठी ही सुविधा देण्यात आली होती.

(1 एप्रिल 2020 च्या जुन्या वाहनांवर बंदी, प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

त्यामुळे आता नव्या नियमांनुसार शून्य रक्कम असलेल्या खातेधारकाला एटीएममधून चार वेळा मोफत पैसे सुद्धा काढता येणार आहेत. तसेच बँकेकडून ग्राहकांना अतिरिक्त सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.