Shocking! महिलेचे अपहरण करून मागितली खंडणी; पती रक्कम देऊ न शकल्याने नराधमांनी पीडितेवर केला सामूहिक बलात्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Shocking! भरतपूरमध्ये चार मुलांच्या आईवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील खुर्जा येथील जंगलात महिलेला ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नराधमांनी या महिलेला बंधक बनवल्याचं सांगण्यात येत आहे. या महिलेच्या कुटुंबीयांकडून खंडणीची मागणी करण्यात आली होती. पैसे न मिळाल्याने महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या तीन नराधमांनी महिलेचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे. नराधमांनी महिलेच्या पतीकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती. कशीतरी ही महिला बदमाशांच्या तावडीतून सुटून तिच्या घरी पोहोचली आणि तिने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. (हेही वाचा - Dowry: बहिणीच्या नवऱ्यावर तरूणीचे जडले प्रेम, लग्नानंतर हुंड्यासाठी दिला त्रास)

प्राप्त माहितीनुसार, महिला तिच्या सहकारी महिलेसोबत 6 मे रोजी खरेदी करण्यासाठी बाजारात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश क्रमांकाची जीप तेथे पोहोचली आणि त्यात बसलेल्या लोकांनी पीडितेचे अपहरण केले. आरोपीच्या तावडीतून पळून गेल्यावर पीडिता घरी पोहोचली तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र तिची तक्रार नोंदवण्यात आली नाही. त्यानंतर कोर्टामार्फत महिलेने युसूफ, रवींद्र शर्मा आणि शैलेंद्र जाटव या तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात अपहरण, खंडणी मागणे आणि सामूहिक बलात्काराच्या कलमांखाली तक्रार दाखल केली आहे.

पीडित महिलेने सांगितले की, 'मला ओलीस ठेवले आणि माझ्या पतीला फोन करून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न मिळाल्याने त्यांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. तिसऱ्या दिवशी मी त्यांच्या तावडीतून पळ काढला आणि घरी पोहोचले. कोर्टामार्फत पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, तपास अधिकारी सतीश वर्मा यांनी सांगितले की, पीडित महिलेने तीन नराधमांविरुद्ध अपहरण, खंडणी आणि सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.