
राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा आज संसद भवनात (Parliament) निरोप समारंभ (Farewell ceremony) आयोजित केला जाणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ आज संध्याकाळी 5 वाजता संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, तसेच दोन्ही सभागृहांचे सर्व खासदारही या निरोप समारंभात सहभागी होणार आहेत. यादरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे निरोप घेतील आणि संसद सदस्यांच्या वतीने राष्ट्रपतींना प्रशस्तीपत्रही देतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसद सदस्यांनी स्वाक्षरी केलेले 'स्मृतीचिन्ह' आणि 'स्वाक्षरी पुस्तक' देखील सादर केले जाईल.
संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 18 जुलै ते 21 जुलै या कालावधीत खासदारांच्या स्वाक्षरीसाठी 'सिग्नेचर बुक' ठेवण्यात आले होते. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यांच्यासाठी जनपथ रोडवरच बंगला देण्यात आला आहे. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर कोविंद नवी दिल्लीतील 12 जनपथ येथील बंगल्यात शिफ्ट होतील. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचे या बंगल्यात अनेक दशके वास्तव्य होते.
लोजपा नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चिराग पासवान याने हा बंगला काढला होता. यादरम्यान बराच वाद झाला. तत्पूर्वी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी निरोप मेजवानी आयोजित केली होती. या मेजवानीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही आले होते. दिल्लीतील हॉटेल अशोका येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हेही वाचा Agneepath Scheme: अग्निपथ योजनेविरुद्ध झालेल्या आंदोलनामुळे रेल्वेचे 259.44 कोटी रुपयांचे नुकसान; 2000 गाड्या झाल्या होत्या रद्द
या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे देशभरातील अनेक आदिवासी नेतेही यात पोहोचले. यासोबतच अनेक पद्म पुरस्कार विजेत्यांनीही निरोप समारंभात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याच्या तयारीच्या संदर्भात फुल ड्रेस रिहर्सल आयोजित केल्यामुळे आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गार्ड चेंज सोहळा होणार नाही. विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला आहे.