अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme Protest) देशभरातील युवक आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी रास्ता रोको तर अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता या तरुणांना शेतकरी संघटनांचाही पाठिंबा मिळाला आहे. युनायटेड किसान मोर्चा (SKM) ने 24 जून रोजी देशव्यापी आंदोलनाची (Nationwide Protests) घोषणा केली आहे. या निदर्शनाची घोषणा करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी ट्विट केले की, '24 जून रोजी अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील जिल्हा-तहसील मुख्यालयात आंदोलन केले जाईल'. कर्नालमध्ये एसकेएमच्या (SKM) समन्वय समितीच्या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. टिकैत यांनी शुक्रवारी निदर्शनासाठी युवक, नागरी संस्था आणि राजकीय पक्षांचे समर्थन मागितले आहे.
Tweet
संयुक्त किसान मोर्चा का 24 जून को अग्निपथयोजना के खिलाफ देशभर में जिला-तहसील मुख्यालयों पर विरोधप्रदर्शन।SKMकॉर्डिनेशन कमेटी का करनाल में फैसला।युवा-नागरिक संगठनों-पार्टियों से जुटने की अपील।भाकियू 30 के प्रदर्शन के बजाय 24 के फैसले में ही शामिल। @ANI @PTI_News #YouthEmpowerment pic.twitter.com/NFaGjYEiNM
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) June 20, 2022
भारतीय किसान युनियन चे राष्ट्रीय प्रवक्ते टिकैत यांनी ट्विट केले की, "तरुणांना, नागरी संघटनांना, पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन आहे. 30 जून रोजी भारतीय किसान युनियनचे निदर्शने 24 जून रोजी होणार आहे. (हे देखील वाचा: Anand Mahindra On Agnipath Scheme: उद्योगपती आनंद महिंद्रा यांची 'अग्निपथ' उपक्रमाबाबत महत्त्वाचे वक्तव्य)
टिकैतची संघटना असलेल्या भारतीय किसान युनियनने (BKU) यापूर्वी 30 जून रोजी अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. बीकेयू हा कृषी कायद्यांविरुद्ध एसकेएमच्या नेतृत्वाखालील चळवळीचा भाग होता. शेतीविषयक कायदे मागे घेण्यात आले.