Accident (PC - File Photo)

Rajastan Shocker:  राजस्थान(Rajastan)  मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बारमेर जिल्ह्यात शनिवारी एका सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. 27 जणांना घेवून जाणाऱ्या बसला डंपरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.  मोहम्मद इब्राहिम आणि सविना असं या घटनेत मृत झालेल्यांची नावे आहे. शनिवार रात्री आठच्या सुमारास ही दु:खद घटना घडली. सेहलाऊ गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत बसचे फार मोठं नुकसान झाले आहे.

रानीवारा येथे आयोजित केलेल्या विजयी स्पर्धेनंतर ते घरी परतत होते त्यावेळी हा अपघात घडला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, सेहलाऊ गावाजवळ भरत माला रोडवर बस चालकाला रात्रीच्या वेळी डंपर दिसला नाही. बस थेट जावून डंपर ट्रकला आढळला. या घटनेत मोठा अपघात झाला. डंपर ट्रकचा पार्किंग लाईट बंद असल्यामुळे हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी लोकांना बस मधून बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यध्यापकाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आणि जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचार करताना मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.