Bharatpur: धक्कादायक! राजस्थानच्या भरतपूर येथे प्रेमी युगुलांवर स्थानिकांचा हल्ला; तरूणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ आला समोर
Goons thrashed a girl in Rajasthan's Bharatpur (Photo Credits: YouTube/Screengrab)

राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूर (Bharatpur) येथे प्रेमी युगुलांवर (Couple) स्थानिक नागरिकांनी हल्ला केल्याचा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. संबंधित जोडप एकांत बसन गप्पा करत असताना काही स्थानिकांनी पाहिले. त्यानंतर स्थानिक जोडप्यांचा जवळ येऊन त्यांना शिवीगाळ करू लागले. तसेच मारहाण करण्यास सरुवात केली. दरम्यान, संधी मिळताच तरूणाने तेथून पळ काढला. परंतु, संबंधित तरूणी त्यांच्या हातात सापडली. त्यानंतर स्थानिकांनी त्या तरूणीला शिवीगाळ करत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

याप्रकरणावर जिल्ह्याचे एसपी देवेंद्र बिश्नोई म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ भरतपूरच्या नगर कस्बे येथील आहे. या व्हिडिओ काही जण तरूणीला मारहाण करताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकळी केली जाणार आहे. त्याचबरोबर पोलिस स्टेशन प्रभारीला त्याचा तपास व कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हा व्हिडिओ सुमारे सात दिवसांपूर्वीचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- Rajasthan: जोधपूरमध्ये टूरिस्ट बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

व्हिडिओ-

महत्वाचे म्हणजे, या घटनेतील तरूणीला मारहाण केल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर प्रेमी युगुलांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.