अर्थव्यवस्था, महागाई, घसरलेला GDP आदी गोष्टींवर केंद्रातील मोदी सरकारची पिछेहाट होत असल्याचे दिसत असताना आता विरोधकांनी आणि स्वपक्षक्षीयांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते दिवंगत प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांचे पूत्र आणि भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचे बंधू राहुल महाजन (Rahul Mahajan) यांनीही मोदी सरकारवर (Modi Government जोरदार टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून केलेल्या या टिकेत राहुल महाजन यांनी महागाई, बेरोजगारी, GDP आदिंवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल महाजन यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटले आहे की, अर्थव्यवस्था, नोकरी, बेरोजगारी, महंगाई, GDP या सर्वांचे उत्तर राष्ट्रवाद असू शकत नाही. टीका आणि विरोध हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. आज राहुल बजाज यांचा आवाज आपण दाबून ठेवाल. उद्या बेरोजगार तरुणांचा उद्रेक आपण रोखू शकणार नाही. जमीनीवर (तळागाळात) काम व्हायला हवे आणि होणाऱ्या टीकेचे सरकारने स्वागत करायला शिकायला हवे, असेही राहुल महाजन यांनी ट्विटरच्या माध्यमतून म्हटले आहे. (हेही वाचा, राहुल महाजने केले तिसऱ्यांदा लग्न)
राहुल महाजन यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्योगपती राहुल बजाज यांचाही उल्लेख केला आहे. राहुल बजाज यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते की, देशात सध्या भीतीचे वातावरण आहे. लोक सरकारवर टीका करण्यास घाबरत आहेत. लोकांना हा विश्वास वाटत नाही की, सरकारवर केली जाणारी टीका सहन केली जाईल. राहुल बजाज (Rahul Bajaj) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या समोर उद्योगपतींच्या एका कार्यक्रमात हे विधान केले आहे. त्यामुळे राहुल बजाज सध्या जोरदार चर्चेत आहेत.
राहुल महाजन ट्विट
अर्थव्यवस्था, नौकरियाँ, महंगाई, GDP सभी का जवाब ‘राष्ट्रवाद’ नहीं हो सकता। आलोचना और समीक्षा लोकतंत्र के लिए बहुत जरूरी है, आज राहुल बजाज की आवाज आप दबा लेंगे, कल बेरोजगार युवाओं के शोर को नहीं रोक पाएँगे। जनहित से जुड़े मुद्दों पर काम हो और आलोचनाओं का स्वागत करना सीखे सरकार।
— Rahul Mahajan (@TheRahulMahajan) December 2, 2019
राहुल महाजन हे भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे चिरंजीव आहेत. प्रमोद महाजन यांचे एकेकाळी भाजपमध्ये प्रचंड मोठे प्रस्त होते. त्यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणूनही पाहिले जात असे. मात्र, बंधू प्रवीण महाजन यांनी गेलेल्या गोळीबारात महाजन यांचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर विविध कारणांमुळे राहुल महाजन चर्चेत आले होते. राहुल महाजन हे बिग बॉस या टीव्ही रिअॅलिटी शोचे माजी कंटेस्टेंट राहिले आहेत. तसेच, इतरही काही रिअॅलिटी शोमध्ये राहुल महाजन यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वडीलांप्रमाणे त्यांनी राजकीय क्षेत्र न निवडता इतर क्षेत्रात पदार्पण केले. सध्या राहुल यांच्या भगिनी पूनम महाजन या भाजप खासदार आहेत.