Rahul Gandhi On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहेत - राहुल गांधी
Rahul Gandhi and Narendra Modi (Photo Credits: ANI)

Rahul Gandhi On PM Narendra Modi: आज संसदेत प्रचंड गदारोळात 2 कृषी विधेयकं (Farm Bill) मंजूर करण्यात आली. यानंतर या विधेयकाविरोधात विविध राज्यातील शेतकऱ्यांनी निषेध आंदोलने केली. तसेच विरोधकांकडूनदेखील या विधेयकावर जोरदार टीका करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहेत, अशी खोचक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी या विधेयकावरून दोन प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार? एमएसपीची खात्री का नाही?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहेत. (हेही वाचा -Parliament Session 2020: प्रचंड गदारोळात 2 कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर; कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, 'शेतकरी हितासाठी MSP व्यवस्था राहणार कायम')

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. मात्र, देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीन कृषी विधेयके आज संसदेच्या राज्यसभेत मांडण्यात आली होती. यातील दोन विधेयकं आज राज्यसभेत मंजूर करण्यात आली आहे.