Rahul Gandhi Punjab Visit: राहुल गांधी आज पंजाब दौऱ्यावर, दरबार साहिबमध्ये घेतले दर्शन (Watch video)
Rahul gandhi punjab visit

 Rahul Gandhi Punjab Visit:  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन प्रार्थना आणि स्वयंसेवकांसोबत सेवा केली.  सोशल मीडियावर  व्हिडिओ पोस्ट केले आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या गर्भगृहात अनेक लोकांच्या मध्ये उभे राहून गांधी हात जोडून प्रार्थना करताना दिसले. काँग्रेस नेते राहुल गांधी आज 2 ऑक्टोबर रोजी पंजाब दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अमृतसर येथील श्री दरबार साहिब येथे दर्शन घेतले आणि तेथे सेवा करत आहे. मात्र, राहुल गांधी यांचा पंजाब दौरा वैयक्तिक असल्याचे बोलले जात आहे. पण पंजाबमधील काँग्रेसच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी काँग्रेस नेत्यांचीही बैठक घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.