Punjab News: पंजाब (Punjab) येथील कपुरथला भागातील गुरुद्वाराजवळ निहंग शिख आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबारात एक पोलिसाला जीव गमवावा लागला, तर तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. कपूरथला येथील सुलतानपूर लोधी येथील गुरुद्वारा श्री अकाल बुंगा साहिब येथे आज सकाळी पोलिस आणि निहंगांमध्ये गोळीबार झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबारच्या घटनेत एका पोलिसाला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, पोलिसांनी काही निहंग शीखांना अटक करण्यासाठी आले असताना निहंंग शिखांनी हा हल्ला केला.या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. तर एका पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार परिसरात कडक बंदोबस्त लावला आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाले आहे. या गुरुद्वाराच्या ताब्यावरून दोन गटात वाद सुरु होता.
दोन प्रतिस्पर्धी निहंग गटांनी गुरुद्वाराच्या मालकीचा दावा केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कपूरथला येथील सुलतानपूर लोधी गुरुद्वारा श्री अकाल बुंगाच्या ऑपरेशनवरून हा संपूर्ण वाद झाला होता. निहंग शिखांचा एक गट गुरुद्वारा चालवतो. तर दुसऱ्या गटातील 30हून अधिक निहंगांनी गुरुद्वारा अकालपूर बुंग्यात घुसुर परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ही घटना घडली.