Cyber Crime | Representational Image | (Photo Credits: Pixabay)Crime

डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे (Dating App) पुणे (Pune) येथील एका महिलेची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) झाल्याचे समोर आले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीने ऑनलाइन फसवणुक करून 73.5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पीडितेने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) एफआयआर दाखल केला आहे. आज जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, या वर्षी जूनमध्ये तक्रारदार डेटींग अॅपवर फसवणूक करणाऱ्याच्या संपर्कात आला. ज्याने स्वत: ला परदेशी सिद्धार्थ रवी म्हणून सांगितले होते. त्याने पुढे व्हॉट्सअॅपद्वारे महिलेशी संपर्क विकसित केला. तिला लग्नाचे आश्वासन दिले. तसेच फसवणूक करणाऱ्याने महिलेला सांगितले की त्याने भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर त्याने तिला सांगितले की तो भारतात पोहचला आहे. परंतु 1 कोटी रुपयांची प्रचंड रोख रक्कम बाळगल्याबद्दल कस्टम विभागाने त्याला पकडले. फसवणूक करणाऱ्याने नंतर त्या महिलेला काही दंड आणि करांसह आवश्यक शुल्क भरून मदत करण्यास सांगितले. जेणेकरून सीमाशुल्क विभाग त्याला रोख रक्कम देऊन सोडून देईल. फसवणूक करणाऱ्याने तिला काही विशिष्ट बँक खात्यांचा तपशील दिला आणि त्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.

महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि अनेक ऑनलाइन व्यवहारांद्वारे 73,59,530 रुपये या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले. परंतु पैसे हस्तांतरित केल्यानंतर फसवणूक करणा -याने त्या महिलेशी संपर्क करणे बंद केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने त्वरित पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. हेही वाचा Sameer Khan Arrest Case: समीर खान अटक प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी NCB वर केलेल्या गंभीर आरोपांवर समीर वानखेडे यांचे उत्तर

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात सायबर क्राईमचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ए.बी. जगताप करत आहेत. आरोपी लवकरात लवकर पोलिसांच्या जाळ्यात सापडेल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.