Sameer Khan Arrest Case: समीर खान अटक प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी NCB वर केलेल्या गंभीर आरोपांवर समीर वानखेडे यांचे उत्तर
Nawab Malik & Sameer Wankhede (Photo Credits: Facebook, ANI Twitter)

क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणात (Cruise Drug Party) एनसीबीने (NCB) शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीवर जोरदार टीका केली आहे. त्यांची टीकेची मालिका अद्याप संपलेली नाही. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जावई समीर खान याच्या अटक प्रकरणावरुन (Sameer Khan Arrest Case) पुन्हा एकदा एनसीबीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी आपला जावई समीर खान याला एनसीबीनं अडकवल्याचं म्हटलं. यावर आता मुंबई एनसीबीचे डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी उत्तर दिले आहे.

समीर वानखेडे म्हणाले की, "हे प्रकरण सध्या वरच्या कोर्टात आहे. अशा प्रकरणामध्ये आपण त्यावर काही बोलू शकत नाही." तसंच 200 किलो गांजा सापडलाच नसल्याचा उल्लेख कोर्टाच्या अहवालात केल्या असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले. त्यावर बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, “तुम्ही रिपोर्ट व्यवस्थित वाचा." (समीर खान अटक प्रकरणावरुन नवाब मलिक यांचा पुन्हा एकदा एनसीबीवर हल्लाबोल, पत्रकार परिषदेत केले गंभीर आरोप)

दरम्यान, नवाब मलिक यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत न्यायालयाचा अहवाल आणि समीर वानखेडे यांचा नंबर जाहीर केला. यावर समीर वानखेडे म्हणाले की, "माझा नंबर जाहीर केला, हरकत नाही, ती त्यांची इच्छा आहे."

काय म्हणाले होते नवाब मलिक?

"माझा जावई समीर खान याला 200 किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तसंच तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असंही सांगण्यात आलं होतं. मात्र 200 किलो गांजा सापडलाच नाही, असं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये म्हटलं आहे. केवळ शाहिस्ता फर्निचरवालाकडे 7.5 ग्रॅम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एनसीबीला तंबाखू आणि गांजामधील फरक कळत नाही, हे आश्चर्यकारक आहे. तरीही लोकांना तरी लोकांना अडकवण्यात आलं," असं नबाव मलिक यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर त्यांनी एसीबीच्या अधिकाऱ्याएसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले आणि समीर वानखेडे यांचा फोन नंबरही दिला. यापूर्वी देखील नवाब मलिक यांनी एनसीबीवर जोरदार टीका करत क्रुझ पार्टीवरील त्यांचा छापा बनावट असल्याचे म्हटले होते.