काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सोमवारी (11फेब्रुवारी) लखनऊ (Lucknow) येथे भव्य रॅलीचे आयोजन केले होते. तसेच प्रियांका गांधी यांच्या रोड शोमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मात्र कार्यकर्त्यांचे महागडे फोन या रॅलीवेळी चोरीला गेल्याचा खुलासा झाला आहे. यामुळे पक्षातील कार्यतकर्त्यांनी धरणं आंदोलनाला सुरुवात केली आहे.
तसेच या रोड शो दरम्यान भामट्यांनी कार्यकर्त्यांच्या खिशातील मोबाईलसह अन्य मौल्यवान दागिने आणि कागदपत्रे ही चोरली आहेत. त्यावेळी एका तरुणाला या प्रकरणी पकडून त्याला मारहाण करत पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या या तक्रारीवर पोलीसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण होऊन धरणं आंदोलन करण्यास सुरुवात केली.(हेही वाचा-प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर पती रॉबर्ट वड्रा यांचं भावूक ट्विट)
तत्पूर्वी लखनऊ येथे काँग्रेस पक्षाकडून पोस्टरबाजी करण्यात आली होती. तसेच पोस्टरवर विविध घोषणा लिहिल्या असून त्यातून सरकारवर टीका करण्यात आली. तर पोस्टच्या माध्यमातून 'आ गई बदलाव की ऑंधी, राहुल संग प्रियांका गांधी' असे लिहिण्यात आले होते.