लखनऊमध्ये आज प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचा रोड शो सुरू झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून पडद्यामागून काम करणार्या प्रियंंका गांधीचा आज सक्रिय राजकारणामध्ये खर्या अर्थाने प्रवेश झाला. लखनऊचा रोड शो सुरू करण्यापूर्वी त्यांनी आज ट्विटर जॉईन केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातूनच प्रियंकाचे पती रॉबर्ट वड्रा ( Robert Vadra) यांनी तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वाला शुभेच्छा दिल्या आहे. मात्र शुभेच्छा देतानाच राजकारणामध्ये वातावरण कलुषित आहे. पण भारतवासीयांनो प्रियंकाला सुरक्षित ठेवा अशा भावूक शब्दांत ट्विटरवर (Twitter) पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
रॉबर्ट वड्रा यांच्या शुभेच्छा
#PriyankaEntersPolitics @priyankagandhi 😊👍 pic.twitter.com/9b1DjQZzrN
— Robert Vadra (@irobertvadra) February 11, 2019
उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेल्या तुझ्या या नवीन प्रवासाबददल तुला शुभेच्छा. तू माझी बेस्ट फ्रेंड आहे, उत्तम पत्नी आहेस, आपल्या मुलांची आदर्श आई आहेस. पण राजकारणामध्ये खुनशी आणि लबाडीपणा आहे. देशाची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे त्यामुळे आता भारतीयांसाठी स्वाधीन करतोय, प्रियांकाला सुरक्षित ठेवा. अशा आशयाची पोस्ट रॉबर्ट वड्रा यांनी लिहली आहे.
राजकारणाच्या खेळात प्रियंका गांधी यांची आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सध्या रॉबर्ट वड्रादेखील ईडीच्या चौकशीच्या भोवर्यामध्ये आहेत. प्रियंका रॉबर्ट वड्रा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. लखनऊ येथे प्रियांका गांधी यांच्या 'रोड शो' वर जनतेचे लक्ष, पोस्टरमधून मोदी सरकारवर निशाणा
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच उत्तरप्रदेशच्या दौ-यावर आल्या आहेत.