लखनऊ येथे प्रियांका गांधी यांच्या 'रोड शो' वर जनतेचे लक्ष, पोस्टरमधून मोदी सरकारवर निशाणा
लखनऊ येथे प्रियांका गांधी यांच्या 'रोड शो' वर सर्व जनतेचे लक्ष, पोस्टरमधून मोदी सरकारवर निशाणा (फोटो सौजन्य-ANI)

आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तारीख अद्याप सष्ट झालेली नाही. मात्र राजकीय पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. तत्पूर्वी काँग्रेस (Congress) पक्षात सरचिटणीस पदी विराजमान झालेल्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आज सोमवारी(11 फेब्रुवारी) लखनऊ (Lucknow) येथे 'रोड शो'च्या माध्यमातून जनतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) सुद्धा यावेळी उपस्थित असणार आहेत.

तत्पूर्वी लखनऊ येथे काँग्रेस पक्षाकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तसेच पोस्टरवर विविध घोषणा लिहिल्या असून त्यातून सरकारवर टीका करण्यात आली आहे. तसेच आजच्या रोड शोसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तर दुसरीकडे पोस्टच्या माध्यमातून 'आ गई बदलाव की ऑंधी, राहुल संग प्रियांका गांधी' असे लिहिण्यात आले आहे. (हेही वाचा-उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील विषारी दारुने झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना सरकारी नोकऱ्या द्या- प्रियंका गांधी)

प्रियांका गांधी यांनी लखनऊ येथे दौऱ्यावर येण्यापूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांना एका ऑडिओ क्लिपद्वारे संदेश दिला होता. त्यामध्ये त्यांनी मी लखनऊ येथे दौऱ्यावर येणार असून आपण सर्वांनी मिळून एक नवीन राजकरणाची सुरुवात करु असे म्हटले होते.