Sydney: ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधान अल्बानीजचे पंतप्रधान मोदींना आश्वासन; म्हणाले, 'कठोर कारवाई करू'
Anthony Albanese, PM Narendra Modi (PC - Twitter/@narendramodi)

Sydney: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर होणारे हल्ले आणि देशातील खलिस्तानींच्या वाढत्या कारवायांवर चर्चा केली. पत्रकारांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना धक्का पोहोचल्यास आम्हाला जमणार नाही.

भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि जागतिक कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेले हल्ले आणि फुटीरतावादी घटकांच्या कारवायांबाबत आम्ही आधीच बोललो आहोत. आजही हे मुद्दे चर्चिले जातात. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंधांना कोणीही आपल्या कृतीतून किंवा विचारसरणीतून हानी पोहोचवू शकते, हे आम्हाला मान्य नाही. (हेही वाचा - Inauguration of New Parliament Building: नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार; उद्धव ठाकरे गट, NCP देखील राहणार अनुपस्थित)

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार (CECA) मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे द्विपक्षीय व्यापार संबंधांचा लक्षणीय विस्तार होण्याची अपेक्षा आहे. तसेच, दोन्ही बाजूंनी ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई केल्याबद्दल मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान अल्बानीज यांनी मला पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे की ते भविष्यातही अशा घटकांवर कठोर कारवाई करतील.

nbsp;

मोदी म्हणाले की, गेल्या वर्षभरातील आमची ही सहावी बैठक आहे. यावरून आमच्या नात्याची खोली दिसून येते. गंमतीत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर आमचे नाते टी-20 मध्ये आले आहे. दरम्यान, अल्बानीजने जाहीर केले की, ऑस्ट्रेलिया बेंगळुरूमध्ये नवीन वाणिज्य दूतावास स्थापन करेल. तथापी, चर्चेपूर्वी मोदींना सिडनीतील अॅडमिरल्टी हाऊसमध्ये गार्ड ऑफ ऑनर पुरस्कार देण्यात आला.