
Punjab Shocker: पंजाब येथील अमृतसर (Amritsar) येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या गर्भवती पत्नीची हत्या करून तीचा मृतदेह (Deathbody) जाळला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आले आहे. शनिवारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पतीने गर्भवती महिलेचा खून केल्यानंतर परिसर ही घटना वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना हत्येप्रकरणात माहिती देण्यात आली. (हेही वाचा- हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्मशानभूमीची भिंत कोसळून 4 जणांचा मृत्यू)
मिळालेल्या अधिका माहितीनुसार, गर्भवती महिला पतीसोबत बुलेनंगर परिसरात राहत होती. बियास पोलिस ठाण्यात हत्येची माहिती मिळताच, घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. काही क्षुल्लक कारणावरून भांडण झालं होते त्यामुळे त्यांने पत्नीचा खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांमध्ये शुक्रवारी जोरदार वाद झाला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. गुरुगोविंद असं आरोपीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करतो. तर मृत महिलेचे नाव पिंकी होते. ती २३ वर्षाची होती. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. हत्या झाल्यानंतर परिसरात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर खूनाचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती प्रसारित केली आहे.