भाजप आमदाराच्या पत्नीची पोलिसात तक्रार, एका महिलेसह चौघांवर गंभीर आरोप
CRIME | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

भाजप (BJP) आमदार महेश नेगी (Mahesh Negi) यांच्या पत्नीने डेहराडून (Dehradun) येथील नेहरु कॉलनी पोलीस (Nehru Colony Police Station) दप्तरी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार एक महिला आणि इतर तिघे अशा चौघांविरुद्ध दाखल करण्यात आली आहे. आमदार महेश नेगी यांना ब्लॅकमेल करण्याची आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्यचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या चौघांनी मिळून आमदार नेगी यांना पाच कोटी रुपयांची खंडणी मगितल्याचाही आरोप नेगी यांच्या पत्नीने केला आहे.

उत्तराखंडचे डीजी अशोक कुमार यांनीही या वृत्ताची पुष्टी केली आहे. दुसऱ्या बाजूला आरोपी महिलेने एक व्हिडिओ जारी करत आमदारासोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधातून तिला एक मुलगी झाल्याचा आरोप केला आहे. आमदाराच्या पत्नीचा आरोप आहे की, तिचा पती राजकारणात असल्याने आणि आमदार आणि राजकीयदृष्ट्या वजनदार असल्याने आरोपी महिलेस आणि तिच्या कुटुंबीयांना मदत करत होते. परंतू, महिलेचे वर्तन योग्य नसल्याने त्यांनी तिच्या घरी जाणे येणे बंद केले. आरोपी महिलेने 9 ऑगस्ट रोजी तिच्या पतीकडे (आमदार नागे) यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि अनैतिक संबंधाच्या प्रकरणात ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली. मुलाला ठार मारण्याचीही धमकी या महिलेने दिल्याचा आरोप आमदार पत्नीने केला आहे. हे सर्व संभाषण फोनवर झाल्याचे आमदार पत्नीचे म्हणने आहे.

डीआयजी अरुण मोहन जोशी यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, आरपी महिलेसह लष्करात असलेला तिचा पती, आई, वहीणी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कल 386 आणि 389 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, सातारा: अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका विवाहित महिलेच्याविरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, आरोपी महिलेचा आरोप आहे की, तिचे आणि आमदार नागे यांचे गेल्या दोन वर्षांपासून विवाहबाह्य संबंध आहेत. या संबंधातून त्यांना एक मुलगीही झाली आहे. मुलीच्या डीएनए तिच्या पतीशी जुळला नाही. मुलीचा डिएनए आमदाराच्या डीएनएशी जुळतो असा या महिलेचा दावा आहे. डिएनए चाचणी करण्याबाबत कोर्टाद्वारे मान्यता मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.