भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर  Virender Sehwag ची प्रतिक्रीया
Virender Sehwag (Photo Credits: Twitter @virendersehwag)

धडाकेबाज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) राजकारणात पर्दापण करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. सेहवाग भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवणार, असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले. हरयाणा राज्यातून सेहवाग निवडणूक लढवणार असल्याचेही माहिती समोर आली होती. मात्र या सर्व चर्चेला पूर्णविराम देणारे ट्विट वीरेंद्रने केले आहे. विरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात? हरियाणा राज्यातून भाजपसाठी करणार बॅटींग?

मी राजकारणात येणार, ही निव्वळ अफवा असल्याचे सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे. यात कोणतेही तथ्य नसल्याचे सेहवागने स्पष्ट केले आहे. 2014 मध्ये देखील वीरेंद्र सेहवाग भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची अफवा पसरली होती. पाच वर्षानंतरही हीच अफवा नव्याने पसरली आहे. पण यात मला तेव्हाही रस नव्हता आणि आताही नाही, असे सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांना टक्कर देण्यासाठी वीरेंद्र सेहवागला निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होती. मात्र ट्विट करत सेहवागने या रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

वीरेंद्र सेहवाग पूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि करिना कपूर या देखील राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. मात्र या अफवा असल्याचे स्पष्टीकरण दोन्हीही अभिनेत्रींनी दिले.