जगमोहन रेड्डी यांच्या शपथविधीपूर्वी पावसाचा अडथळा, कार्यक्रमस्थळाची दयनीय अवस्था
Visuals from the venue of Jaganmohan Reddy's swearing-in-ceremony (Photo Credits-ANI)

आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) वायएसआर (YSR) काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी झाला. त्यामुळे आज जगमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) आज (30 मे)  मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी बुधवारी रात्री मुसळधार पाऊस आणि वादळामुळे कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला आहे.

जगमोहन रेड्डी यांच्या शपथविधीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.रेड्डी यांनी बहुमताने 175 पैकी 151 जागांवर यंदाच्या लोकसभा निवडणूकीत विजय मिळवला. तसेच आज दुपारी 12.23 वाजता रेड्डी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपाल नरसिंह राव हे बुधवारीच हैदराबाद मध्ये दाखल झाले.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आज होणार संपन्न, 8000 लोकांच्या उपस्थितीत रंगणार हा भव्यदिव्य सोहळा)

परंतु जोरदार वादळ आणि पावसामुळे कार्यक्रमस्थळाची अवस्था बिकट झाली आहे. तर उभारण्याच आलेले मंडपाचे पडदे सुद्धा उडून गेल्याचे दिसून आले आहे. त्याचसोबत घटनास्थळी पावसामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे आता रेड्डी शपथविधीचा सोहळा कुठे घेणार याबद्दल स्पष्ट झालेले नाही.