आनंदीबेन पटेल (Photo Credit: PTI)

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन (Lalji Tandon), आरोग्याच्या कारणास्तव सुट्टीवर असल्याने आनंदीबेन यांना राष्ट्रपतींच्या वतीने ही जबाबदारी देण्यात आली आहे. रविवारी राष्ट्रपती सचिवालयानं अतिरिक्त कामाच्या बोजाबाबत अधिसूचना जारी केली. लखनौच्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची प्रकृती दोन दिवसांपूर्वी गंभीर बनली होती. त्यांना वैकल्पिक व्हेंटिलेटर समर्थनावर ठेवण्यात आले होते. टंडन यांची प्रकृती सुधारत आहे, पण ते व्हेंटिलेटरवर आहेत, असे शनिवारी रुग्णालयाने सांगितले. “मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहेत. त्यांनी कुटुंबातील सदस्यांसह आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला परंतु अद्याप ते व्हेंटिलेटरवर आहेत, मेदांता रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले. मेदांता-लखनऊ येथील वैद्यकीय तज्ञांची टीम उत्कृष्ट वैद्यकीय उपचारांसाठी अथक प्रयत्न करत आहे. टंडन यांच्या यकृतामध्ये सापडलेल्या समस्येवर सीटी गाइडेड प्रक्रिया केली गेली असून त्यांच्यावर 11 जूनपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रपती भवनाने (Rashtrapati Bhavan) जारी केलेल्या निवेदनात म्हटले की,"लालजी टंडनच्या अनुपस्थितीत मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे कामकाज सोडण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती केली आहे." गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी मध्य प्रदेशच्या राज्यपालही होत्या. दरम्यान, राज्यपाल लालजी टंडन यांची कोरोना टेस्टही घेण्यात आली ज्याचा अहवाल नकारात्मक आला होता. 10 दिवसांच्या सुट्टीवर ते लखनऊला पोहोचले होते, परंतु त्यांची प्रकृती खालावली. यानंतर श्वासोच्छवासाची समस्या, लघवी होण्यास त्रास आणि ताप यामुळे 11 जून रोजी सकाळी त्याला मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुसरीकडे, शिवराज मंत्रिमंडळाचा विस्तार 30 जून रोजी होण्याची चर्चा सध्या सुरु आहेत. सध्याचे राज्यपाल लालजी टंडन आजारी असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात अडचण झाल्याचे दिसत असले तरी परंतु रविवारी रात्री उशीरा राष्ट्रपतींच्या वतीने मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन यांना दिल्याने परिस्थिती आता साफ झाली आहे.