West Bengal: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची रविवारी (3 फेब्रुवारी) पश्चिम बंगाल येथील बालुरघाट येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले. मात्र हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी नकारल्याने आदित्यनाथ यांची रॅली रद्द झाल्याने सांगण्यात येत आहे.
पश्चिम बंगाल येथे आदित्यनाथ यांनी चार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर रॅलीच्या माध्यमातून ते जनतेला संबोधित करणार होते. तर आज पुरुलिया आणि बांकुरा येथे दोन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर मंगळवारी (5 फेब्रुवारी) रायगंज आणि दिनाजपूर येथे सुद्धा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पश्चिम बंगालच्या सरकारने आदित्यनाथ यांच्या रॅलीला नकार दिला आहे. (हेही वाचा-मोदी सरकारची Expiry Date संपली, ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल)
तर आदित्यनाथ यांची पश्चिम बंगाल मध्ये लोकप्रियता जास्त असल्याकारणाने ममता बॅनर्जी यांनी हे असे केल्याची टीका भाजप पक्षाकडून करण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वी कोलकाता (Kolkata) येथे विरोधी पक्षांच्या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकार आणि भाजप (BJP) वर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार तुमची 'एक्सापायरी डेट' (Expiry Date) संपली असे म्हणत टीका केली होती.